आठवणीतले खेळ भाग सातवा नमस्कार मित्रांनो आज मी ज्या माझ्या आठवणीतल्या खेळाबद्दल लिहितोय त्याबद्दल बर्याच लोकांना माहिती असेल.त्या खेळाच नाव आहे भोवरा फिरवणे.चला तर मग या खेळाबद्दल जाणून घेवूया. भोवरा या खेळामध्ये २ गोष्टींची आवश्यकता आहे पाहिलं म्हणजे भोवरा आणि दुसरा दोरीपासून बनिविलेली जाळी. भोवरा हा लाकडी किवा प्लास्टिक पासून बनलेला असतो.आकाराने निमुळता आणि अनुकुचीदार असा.एका हातामध्ये भोवऱ्याला पकडून त्याला दोरीने (जाळी) गोल गोल गुंडाळले जाते आणि मग जोरात दोरी खेचून भर्रकन वार्याच्या वेगाने भोवऱ्याला फिरवले जाते. या खेलामाध्यें बरेच प्रकार आहेत म्हणजे जमिनीवर गोलाकार आखून त्यामध्ये आंब्याची कोय ठेवणे आणि त्याला भोवर्याने मारून बारेण काढणे.ज्याच्यावर राज्य अथवा डाव येईल त्याच्या भोवऱ्याला गोलमध्ये ठेवून भोवर्याने मारून बाहेर काढणे.त्याचवेळी ज्याचा भोवरा आतमध्ये आहे तो प्रतिस्पर्ध्याच्या भोवऱ्याला फिरत असताना जाळीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो.या खेळामध्ये बर्याच गमती जमत असतात. या खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याचा भोवरा कसा फोडत येईल याकडे बर्याच लोकांचे लक्ष्य लागून...
आठवणीतले खेळ भाग पांचवा नमस्कार मित्रांनो आज मि माझ्या आठवणीतल्या खेळांच्या मालिकेतील पांचवा खेल घेवून येत आहे. मला वाटत की माझ्या वयाचे सगळे लोक हां खेळ खेळले असतील. या खेळचे नाव आहे काचा कवड्या कदाचित बरेच लोक या खेळाला अनेक अनेक वेगवेगळ्या नवांनी ओळखत असतील. चला तर मग या खेळाविषयी थोड़ी माहिती पाहु. काचा कवड्या या खेळामध्ये काही गोष्टींची आवश्यकता असते. कारण हां एक इंडोर (Indoor) खेल आहे. यामध्ये एखादा पाठ किंवा पाटी चिंचोके,वेगवेगळ्या रंगाच्या काचा,खड़ु यांची गरज आहे. यामध्ये २ किंवा ४ लोक खेलु शकतो. ज्याप्रमाणे carrom खेळतो. पहिल्यांदा पाठावर किंवा जमिनीवर खडूने चौकोन अखनि करुण आप आपली जागा चौकोनामध्ये निश्चित करुण आपल्या रंगाच्या काचेचे ४ टुकड़े घरांमध्ये मांडून घ्यावे लागतात. आणि मैग चिंचोकांचे २ दल टुकड़े पाडून ते उधळायचे आणि त्यानुसार जो अंक येईल तसे आपली घरे चालत जायची. हां बैठा खेल असल्यामुळे घरी आई, आजी,ताई यांच्यासोबत रिकाम्या वेळेत खेळत बसायचो लहानपणी.या खेलमध्ये carrom पेक्षाही मज्जा यायची. जिंदगी की भागदौड़ में आज गम के आंसू पि रहा...
आठवणीतले खेळ भाग पहिला मित्रानो आज आयुष्याच्या वाटेवर पुन्हा एकदा मागे वळून पाहताना लहानपणीचे दिवस आठवतात. आणि आठवतात ते लहानपणीचे खेळ जे आजही आठवले तरी चेहऱ्यावर हळूच हसू खुलते. अश्याच अनेक खेळांची माहितीची मालिका मी आता माज्या ब्लॉग वर लिहित आहे. चला तर मग या मालिकेतील पहिला खेळ पाहू. सायकलची टायर हाताने पळवणे जुन्या सायकलची खराब झालेली टायर घेवून ती हाताने किवा एखाद्या छोट्या लाकडी दांडक्याने रस्त्यावर पळवायची मज्जा काय औरच होती.यामध्ये हि टायर पळवत मित्रांबरोबर शर्यत (Race) लावायची आणि कोण जिंकणार हे एकाच ध्येय बाळगून दम लागेपर्यंत फक्त पळतच सुटायचं .या शर्यतीची आज आठवण आली कि Road Rash सारखी कॉम्पुटर गेमही फालतू वाटते. आज बुलेट,R15,तसेच अनेक Branded गाड्या पळवणे सुद्धा या टायरी च्या खेळासमोर काहीच वाटत नाही. त्यावेळी माज्यासोबत टायरी पळवणारे माजे मित्र म्हणजे जणू मला एखाद्या शर्यतीतले प्रतीस्पर्दीच वाटायचे. आणि अखेर शर्यत जिंकल्यावर एकमेकाला चिडवत नाचण्याचा आनंद काही निराला आणि अनमोल असाच होता. असे लहानपणीचे खेळ आठवल्यावर खरच संत तुकाराम महाराजांच्या ओळी...
Comments