Posts

Showing posts from September, 2018

अंतर

Image
“अंतर” हि गोष्ट मी स्वतः पाहिलेला माझा अनुभव आहे.आमचे ट्रान्स्फर झाल्यामुळे आम्ही १८ लोक बिहार मधील पटना या शहरात नोकरी साठी आलो होतो. तसा बिहार हा प्रदेश आमच्यासाठी पूर्णपणे नवीन आणि खूप वेगळ्या संस्कृतीचा प्रदेश (आम्ही महाराष्ट्र सारख्या सधन भागातून आल्यामुळे आम्हाला बिहार खूप वेगळ वाटल होत). सर्वात नवीन अनुभव म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी ट्रेन चा इतका दूरचा प्रवास केला होता (जवळ जवळ २००० किमी तो हि सर्व सुविधांयुक्त मुंबई ते पटना सुविधा एक्स्प्रेस या ट्रेन ने).तर पटना मध्ये सुरवातीच्या कळत आम्ही सर्वजन खूप फिरायचो (सगळ्यात जास्त आम्हाला फिराव लागल ते जेवणासाठी कारण आम्हाला महाराष्ट्रीयन जेवणाची सवय होती.अनेक हॉटेल मध्ये फिरत असताना आम्हाला खूप वेगवेगळे आणि मजेशीर अनुभव आले ते मी माझ्या पुढच्या लेखात लिहीन). तर आता मूळ गोष्टी वर येवूया आम्ही पटना मधील बोरिंग रोड या ठिकाणी राहतो त्यामुळे बोरिंग रोड ला असणार्या V Mart या मॉल मध्ये नेहमी फिरायला जायचो.असेच एकदा आम्ही ४-५ लोक रविवारी संध्याकाळच्या वेळेला मॉल मध्ये गेलो.थोडीफार खरेदी केली (सवयीप्रमाणे फक्त फिरण्यासाठी गेलो ह...