रिक्षावाला
रिक्षावाला वेळ रात्रीची १०:३०-११:०० ची होती मी माझी पत्नी आणि आई. माझ्या पप्पांना दानापूर पुणे ट्रेन मध्ये बसवण्यासाठी दानापूर जंक्शन ला गेलो होतो.तेथून परत घरी निघाल्यावर आम्हाला हरताली मोड पर्यंत गाडी मिळाली (जे आमच्या रूम पासून साधारण २-३ किलोमीटर आहे). रात्रीची वेळ असल्यामुळे तिथून पुढे जाण्या साठी आम्हाला गाडी तर मिळणार न्हवती (नेहमीप्रमाणे) मग सहज रस्त्याच्या कडेला लक्ष गेले तिथे एक सायकल रिक्षा दिसली आणि त्यात एक ६५-७० वर्षाचा वृद्ध झोपला होता.मग त्या आजोबांना विचारलं मोंटेसरी गली चलोगे?.लगेच तो हो म्हणाला, मी विचारलं कितना पिसा लोगे. भैय्या ३० रुपिया होगा (त्याच्या डोळ्यात एक कमालीचा आनंद आणि आशा दिसत होती). आम्ही तिघे मी माझी पत्नी आणि आई त्या सायकल रिक्षात बसलो आणि तो वृद्ध ती सायकल ओढू लागला.माझी पत्नी आणि आई पहिल्यांदाच रिक्ष्यामध्ये बसल्यामुळे त्यांना कमालीच कुतूहल वाटत होत (हि रिक्षा म्हणजे पेट्रोल किवा डीझेल वरील नाही पूर्ण पने माणसाच्या कष्टावर चालणारी हि रिक्षा जो तो वृद्ध त्याच्या पायाने चालवत होता). थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही तिघेही स्वेटर वैगेरे...