Posts

Showing posts from July, 2017

पाउस .....

Image
पाउस ..... थंड वाहतो जेंव्हा गार गार वारा   आणि बरसू लागतात पावसाच्या धारा   सर्वांची धावपळ आणि मातीचा सुवास   धरती वर होतो स्वर्गाचाच भास   गरम भज्जी आणि चहाचा भुरका   भज्ज्यांबरोबर तिखट मिरची चा चरका   भिजण्याची असते मोठी हौस   पण ग्यालरीतूनच पहायचा फक्तच पाऊस   वाटत आता झेलुया अंगावर गारा   थंड वाहतो जेंव्हा गार गार वारा   आणि बरसू लागतात पावसाच्या धारा ........ आणि बरसू लागतात पावसाच्या धारा ............ ------------- कवी ------------ अभिजित निंबाळकर .........