Posts

Showing posts from December, 2022

सब्र

 सब्र सब्र कर ये बंदे, जिंदगी है बडी  मुस्कुराना हमेशा, बित जायेगी घडी  कहते ही देर है अंधेर नही बस थोडा सब्र कर हो जायेगा सब सही  हर जीत तेरी हो यह जिंदगी नही हार मे भी जीत देख जिंदगी है वही ...... - अभिजित निंबाळकर -

कोल्हापूर ते बिहार एक अनोखा प्रवास

Image
“कोल्हापूर ते बिहार एक अनोखा प्रवास” महाराष्ट्राची वस्त्रनगरी आणि manchestar नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इचलकरंजी’ सारख्या छोट्या शहरातून अभिजित एम.के.सी.एल. मध्ये साधारण १.५ वर्ष काम केल्यानंतर आपल्या करियर मध्ये काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच एका अनोळखी प्रदेशात आणि घरापासून जवळ जवळ २००० कि. मी. दूर अनेक स्वप्ने उराशी बाळगून बिहार या राज्यात पटना साठी जाण्यास ८ ऑगस्ट २०१६ रोजी सहकार्यांसह निघाला (अर्थातच एम.के.सी.एल. मध्येच कार्यरत राहून). गाठीशी बँकिंग क्षेत्राचा आणि मार्केटिंग क्षेत्राचा जेम तेम २ वर्षाचा अनुभव. पहिल्यांदा बिहार मध्ये आल्या नंतर त्याला मनामध्ये किंचित हि वाटत न्हवते कि इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारून काम कराव लागेल.मनामध्ये फक्त काहीतरी वेगळ करायचं,पैसा मिळवायचा,आणि स्वतःची आणि कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करायची हाच विचार (त्याच्या मनात हि कधी हा विचार आला न्हवता कि तो बिहार सारख्या इतक्या दूर राज्यात कुटुंब घेवून राहील). अखेर मनाची तयारी करून अभिजित रेल्वे ने बिहार ला जाण्यासाठी निघाला.प्रवास करत असताना बिहार राज्य आणि तेथील लोकांबद्दल अनेक स...

बबन उर्फ बब्या

Image
 बबन उर्फ बब्या..... इचलकरंजी मध्ये राहणाऱ्या बहुतेक जणांना बब्या हे नाव माहित नाही असं शक्यच नसेल.  आमच्या बालपणापासून नेहमी आठवणीत राहील असा एक अवलिया. मला आठवतं लहान मुलांनी काही आगाऊपणा केला तर बहुतेक मुलांची आई म्हणायची गप्प बस नाहीतर बब्याला बोलवीन. गल्लीच्या कोपऱ्याला एक व्यक्ती हाफ चड्डी आणि खांद्याला भंडार्‍याची पिशवी फक्त पाहिली की सर्व मुले आपापल्या घरात पळून जायचे किंवा लपून बसायचे ती व्यक्ती म्हणजेच बब्या. बब्याला कुणी देव माणूस म्हणे कुणी देव मामा म्हणे किंवा कोणी बब्या म्हणून बोलवत. घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा हा सर्वांचा लाडका बब्या. भिक्षा मागत असताना ती सुपातुनच आणि स्त्रीने डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे हा बाब्याचा कटाक्ष. प्रत्येक स्त्रीला ताई आणि आई असे म्हणून बोलवणारा आणि प्रत्येक स्त्रीला आग्रहाने विचारणारा कि ताई तुला नवरा त्रास तर देत नाही ना?. काही त्रास असेल तर मी सांभाळतो तुला अस म्हणून गरीब असला तरी मनाची श्रीमंती दाखवणारा श्रीमंत माणूस. कोणी त्याला त्रास दिला तर स्वतःलाच त्रास करून घेवून तोंडावर हात मारून घेणारा पण कुणाला काही न म्हणता आपल्...