आठवणीतले खेळ
आठवणीतले खेळ भाग सातवा
नमस्कार मित्रांनो आज मी ज्या माझ्या आठवणीतल्या खेळाबद्दल लिहितोय त्याबद्दल बर्याच लोकांना माहिती असेल.त्या खेळाच नाव आहे भोवरा फिरवणे.चला तर मग या खेळाबद्दल जाणून घेवूया.
भोवरा
या खेळामध्ये २ गोष्टींची आवश्यकता आहे पाहिलं म्हणजे भोवरा आणि दुसरा दोरीपासून बनिविलेली जाळी.
भोवरा हा लाकडी किवा प्लास्टिक पासून बनलेला असतो.आकाराने निमुळता आणि अनुकुचीदार असा.एका हातामध्ये भोवऱ्याला पकडून त्याला दोरीने (जाळी) गोल गोल गुंडाळले जाते आणि मग जोरात दोरी खेचून भर्रकन वार्याच्या वेगाने भोवऱ्याला फिरवले जाते. या खेलामाध्यें बरेच प्रकार आहेत म्हणजे जमिनीवर गोलाकार आखून त्यामध्ये आंब्याची कोय ठेवणे आणि त्याला भोवर्याने मारून बारेण काढणे.ज्याच्यावर राज्य अथवा डाव येईल त्याच्या भोवऱ्याला गोलमध्ये ठेवून भोवर्याने मारून बाहेर काढणे.त्याचवेळी ज्याचा भोवरा आतमध्ये आहे तो प्रतिस्पर्ध्याच्या भोवऱ्याला फिरत असताना जाळीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो.या खेळामध्ये बर्याच गमती जमत असतात.
या खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याचा भोवरा कसा फोडत येईल याकडे बर्याच लोकांचे लक्ष्य लागून राहिलेले असते.
लेखन - अभिजित निंबाळकर


Comments