Posts

Showing posts from June, 2019

तुझे हास्य

! तुझे हास्य ! तुझे निखळ हास्य जणू चंद्र आणि चांदणे  तुझ्याच नावे धडधडतात हृदह्याची स्पंदने  तुझे डोळे जणू मोतीयांचाच भास  तुलाच स्मरतो देहातलाही श्वास  तुज्याच सोबतीने देईन संकटांना मात  जन्मोजन्मी अशीच मला देशील का तू साथ  देशील का तू साथ .............. -- कवी -- अभिजित निंबाळकर 

आस वरुणराजाची

Image
नजर आहे फक्त आज निरभ्र या गगनी  बरस कि रे तू जरा मुक्त या अंगणी  कुठे होवुनी बसला आहेस तू लुप्त  धरणी ला कवेत घेवूनी कर जरा तृप्त  प्रत्येक जीव आज सोसतोय त्रास  वरुणराजा तुझीच आता लागलीये आस  लागलीये आस .................... -- कवी -- अभिजित निंबाळकर