शेतकरी म्हणजे खरच का हो बळीराजा ?....
शेतकरी म्हणजे खरच का हो बळीराजा ?..... शेतकरी म्हणजे खरच का हो बळीराजा का मिळतिये त्याला विनाकारण सजा त्याचाच गहू आज गोदामात किडतो प्रत्येकजण आज त्यालाच पिडतो निसर्गही करतोय रडीचा डाव वरुणराजा करतोय अचानकच घाव आपणही करतो फक्त भाजीअठी मोलभाव मॉलमध्ये साधी किंमत हि विचारात नाही राव शेतकऱ्याला नसते आत्महत्येची हौस त्यालाच कळते काय होत जर पडलाच नाही पाऊस त्यालाही वाटत त्याच्या मुलांनी शिकून कराव काही पण कर्जामुळे तो साधी फीही भरू शकत नाही नशिबाने मांडलाय त्याच्या आयुष्याचा खेळ म्हणून आता आलीये त्याच्यावर संपाची वेळ आपल काय जात म्हणून आपण फक्तच मजा शेतकरी म्हणजे खरच का हो बळीराजा शेतकरी म्हणजे खरच का हो बळीराजा ..................... ----- कवी ----- अभिजित निंबाळकर