कोल्हापूर ते बिहार एक अनोखा प्रवास

“कोल्हापूर ते बिहार एक अनोखा प्रवास”

महाराष्ट्राची वस्त्रनगरी आणि manchestar नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इचलकरंजी’ सारख्या छोट्या शहरातून अभिजित एम.के.सी.एल. मध्ये साधारण १.५ वर्ष काम केल्यानंतर आपल्या करियर मध्ये काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच एका अनोळखी प्रदेशात आणि घरापासून जवळ जवळ २००० कि. मी. दूर अनेक स्वप्ने उराशी बाळगून बिहार या राज्यात पटना साठी जाण्यास ८ ऑगस्ट २०१६ रोजी सहकार्यांसह निघाला (अर्थातच एम.के.सी.एल. मध्येच कार्यरत राहून).

गाठीशी बँकिंग क्षेत्राचा आणि मार्केटिंग क्षेत्राचा जेम तेम २ वर्षाचा अनुभव. पहिल्यांदा बिहार मध्ये आल्या नंतर त्याला मनामध्ये किंचित हि वाटत न्हवते कि इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारून काम कराव लागेल.मनामध्ये फक्त काहीतरी वेगळ करायचं,पैसा मिळवायचा,आणि स्वतःची आणि कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करायची हाच विचार (त्याच्या मनात हि कधी हा विचार आला न्हवता कि तो बिहार सारख्या इतक्या दूर राज्यात कुटुंब घेवून राहील).

अखेर मनाची तयारी करून अभिजित रेल्वे ने बिहार ला जाण्यासाठी निघाला.प्रवास करत असताना बिहार राज्य आणि तेथील लोकांबद्दल अनेक समज गैरसमज त्याच्या मनात थैमान घालत होते.जवळ जवळ ४० तासांच्या प्रवासानंतर पटना मध्ये पोहचलो.तिथे त्याचे मार्गदर्शक आणि वरिष्ठ अनुपम नारखेडे सर भेटले आणि त्यांनी सर्वांची आपुलकीने चौकशी करून एक उत्साह आणि उमेद मनामध्ये भरली.अनोळखी प्रदेशात आपल अस कोणीतरी आहे याची भावना जागी होवून एक उर्जा आणि नवचैतन्य मिळाले.

आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली होती सरकारी प्रोजेक्ट वर काम करत असल्यामुळे अभिजित ला रोज नवे अनुभव येत होते.नवीन भाषा,नवीन लोक,नवीन वातावरण,नवीन कामाची पद्धत सार काही नवीन आणि एक विलक्षण अनुभव.प्रथम सर्व कामाची पद्धत,प्रशिक्षण,आणि अनेक माध्यमातून उपयुक्त अश्या साधनांची माहिती हा रोजचाच त्याचा ऑफिस मधील दिनक्रम.अनेक गोष्टींचे प्रशिक्षण घेत असताना अनेक गमतीजमती,साधनांच्या अभावामुळे थोड्याफार अडचणी येत होत्या.

हळूहळू प्रशिक्षण केंद्रांची नोंदणी,कागदपत्रांची पूर्तता,व्हेरिफिकेशन,रोज अनेक लोकांशी फोन वर बोलणे असा दिनक्रम चालू झाला आणि बिहार मधील भाषा,आर्थिक,सामाजिक,राजकीय,बौद्धिक असे अनेक पेहलू कळत गेले.नंतर अनेक softwares ची माहिती घेवून प्रशिक्षण केंद्रांना support देणे.रोज फोन वर बोलणे.नवीन काही तरी समस्या आली तर संमधीत व्यक्तींना विचारणे किंवा Youtube,Google,Blog यासारख्या माध्यमातून शिकणे.तसेच त्याचे सर अनुपम नारखेडे सर सर्वाना वेळोवेळी मार्गदर्शन आणि रोज काही तरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत होते.(कारण या मुलांनी काही तरी नवीन शिकावे आणि जगात कुठेही गेले तरी मुक्त पंखाने त्यांना स्वैर वावरता यावे हि अतीव आकांक्षा त्यांच्या मनामध्ये होती.

रोज फोन घेणे support देणे,असाच दिनक्रम चालू होता पण काहीतरी नाविन्य कामामध्ये असाव हे ओळखून अनेक नवीन गोष्टी शिकण्यास एक नवीन संधी मिळाली आणि मग अनेक google चे tools शिकणे त्याचा प्रत्यक्षात वापर करणे,नवनवीन assignments करणे,प्रशिक्षण केंद्रांच्या प्रतीनिनिधींसमोर Presentation देणे,Microsoft excel courses, creativity, designing, office tools, creativity, presentation, public speaking, learning on udemy portal, personal relationship management, client relationship management, administration, management, MFS candidates recruitment, Mentorship of MFS candidates, Training to MFS students, Training to LFs and Center Co-coordinators, Conducting and attending various meetings, recording minutes of meeting, communication with stakeholders, communicating various notifications to various different stakeholders i.e. stakeholders from government as well private entities, exam monitoring, control, certificate distribution, marketing, awareness, अश्या अनेक गोष्टी अभिजित आपसूकच शिकत होता. या सर्वांमुळे त्याच्यामध्ये आणि त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक अमुलाग्र बदल घडत होता हे त्याला जाणवत होते.आणि जबाबदारी,कर्तव्य आणि मोठे झाल्याची जाणीव त्याला होत होती.एवान्हा त्याला समजले हि न्हवते पण आता अभिजित चा अभिजित सर झाला होता.

त्याचे मार्गदर्शक अनुपम नारखेडे सर यांच्या बरोबरच आता अभिजीत ला योगेश थोरवे यांचेही एक मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. योगेश सर वरिष्ठ असूनही अभिजित तसेच सर्व टीम सोबत मित्रासारखे वागायचे आणि सतत प्रत्येकाने काहीतरी नवीन शिकावे आणि स्वतः समृद्ध व्हावे असे त्यांना नेहमी वाटायचे. कामामध्ये तसेच आयुष्याच्या प्रत्येक वळणार योगेश सरांचे मोलाचे मार्गदर्शन अभिजित ला लाभले.

आता अभिजित Regional Manager म्हणून काम पाहतोय तसेच Domain Skilling सारख्या प्रोजेक्ट्स वर काम करतोय.आज साधारणतः ५ वर्षांनतरकामाबरोबरच, नाविन्य, Learning, Confidence,  व्यवस्थापन, नियोजन, वक्तशीरपणा, आनंद यासर्वांनी समृद्ध असा अभिजित चा दिवस असतो.

अभिजित ची काम करण्याची जिद्द आणि काही तरी नवीन करून दाखवण्याची तळमळ तर होतीच.पण त्याला योग्य दिशा आणि आकार देण्याच काम अनुपम सरांनी तसेच योगेश थोरवे सरांनीकेल आणि खर्या अर्थाने अभिजित मध्ये एक सक्षम व्यवस्थापक होण्याची क्षमता निर्माण केली.

आज ५ वर्ष मागे वळून पहिले असता असता स्वतःमध्ये घडलेलेला अमुलाग्र बदल आणि जबाबदारीची जाणीव अभिजित ला ठळकपणे जाणवते.आणि मग तो स्वतःच कधी कधी त्याच्या या अनोख्या प्रवासावर अवाक्क होवून विचारांच्या दुनियेत हरवून जातो.............  



- शब्दांकन / लेखक -

अभिजित निंबाळकर


Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ