बबन उर्फ बब्या
बबन उर्फ बब्या.....
इचलकरंजी मध्ये राहणाऱ्या बहुतेक जणांना बब्या हे नाव माहित नाही असं शक्यच नसेल.
आमच्या बालपणापासून नेहमी आठवणीत राहील असा एक अवलिया. मला आठवतं लहान मुलांनी काही आगाऊपणा केला तर बहुतेक मुलांची आई म्हणायची गप्प बस नाहीतर बब्याला बोलवीन. गल्लीच्या कोपऱ्याला एक व्यक्ती हाफ चड्डी आणि खांद्याला भंडार्याची पिशवी फक्त पाहिली की सर्व मुले आपापल्या घरात पळून जायचे किंवा लपून बसायचे ती व्यक्ती म्हणजेच बब्या. बब्याला कुणी देव माणूस म्हणे कुणी देव मामा म्हणे किंवा कोणी बब्या म्हणून बोलवत.
घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा हा सर्वांचा लाडका बब्या. भिक्षा मागत असताना ती सुपातुनच आणि स्त्रीने डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे हा बाब्याचा कटाक्ष. प्रत्येक स्त्रीला ताई आणि आई असे म्हणून बोलवणारा आणि प्रत्येक स्त्रीला आग्रहाने विचारणारा कि ताई तुला नवरा त्रास तर देत नाही ना?. काही त्रास असेल तर मी सांभाळतो तुला अस म्हणून गरीब असला तरी मनाची श्रीमंती दाखवणारा श्रीमंत माणूस.
कोणी त्याला त्रास दिला तर स्वतःलाच त्रास करून घेवून तोंडावर हात मारून घेणारा पण कुणाला काही न म्हणता आपल्या वाटेने जाणारा साधा भोळा देवमाणूस. रागीट पण तितकाच आई ला घाबरणारा, कधी कोनत व्यसन करताना दिसला तर फक्त त्याला म्हंटल कि तुज्या आई ला नाव सांगतो तर पटकन आई ला सांगू नको म्हणणारा बब्या.
आज बब्या अनंतात विलीन झाला पण लहानपणीच्या सर्व आठवणी डोळ्यसमोर आल्या म्हणून थोड्या शब्दात मांडल्या.
आपण काही लोकांना आठवल कि अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात तासात एक निस्वार्थी बब्या.
अश्या या अवलिया आणि निस्वार्थी बब्याला भावपूर्ण श्रधांजली.
- शब्दांकन / लेखक -
अभिजित निंबाळकर

Comments