रिक्षावाला


रिक्षावाला

वेळ रात्रीची १०:३०-११:०० ची होती मी माझी पत्नी आणि आई. माझ्या पप्पांना दानापूर पुणे ट्रेन मध्ये बसवण्यासाठी दानापूर जंक्शन ला गेलो होतो.तेथून परत घरी निघाल्यावर आम्हाला हरताली मोड पर्यंत गाडी मिळाली (जे आमच्या रूम पासून साधारण २-३ किलोमीटर आहे).
रात्रीची वेळ असल्यामुळे तिथून पुढे जाण्या साठी आम्हाला गाडी तर मिळणार न्हवती (नेहमीप्रमाणे) मग सहज रस्त्याच्या कडेला लक्ष गेले तिथे एक सायकल रिक्षा दिसली आणि त्यात एक ६५-७० वर्षाचा वृद्ध झोपला होता.मग त्या आजोबांना विचारलं मोंटेसरी गली चलोगे?.लगेच तो हो म्हणाला, मी विचारलं कितना पिसा लोगे. भैय्या ३० रुपिया होगा (त्याच्या डोळ्यात एक कमालीचा आनंद आणि आशा दिसत होती).
आम्ही तिघे मी माझी पत्नी आणि आई त्या सायकल रिक्षात बसलो आणि  तो वृद्ध ती सायकल ओढू लागला.माझी पत्नी आणि आई पहिल्यांदाच रिक्ष्यामध्ये बसल्यामुळे त्यांना कमालीच कुतूहल वाटत होत (हि रिक्षा म्हणजे पेट्रोल किवा डीझेल वरील नाही पूर्ण पने माणसाच्या कष्टावर चालणारी हि रिक्षा जो तो वृद्ध त्याच्या पायाने चालवत होता).
थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही तिघेही स्वेटर वैगेरे घालून पूर्ण सुरक्षित होतो.रिक्षा मधेच बसल्या बसल्या सहज लक्ष त्या रिक्षा ओढणाऱ्या वृद्धाकडे लक्ष गेले. एवढी थंडी असूनही त्याच्या अंगावर एक फाटकी बनियन आणि बर्मुडा होता.जिथे आम्ही थंडी मुळे कुडकुडत होतो,तिथे रिक्षा ओढता ओढता त्याच अंग पूर्ण पणे घामाने चिंब झाले होते.(एरव्ही जिम मध्ये घाम घालवण्यासाठी हजारो रुपये देवून बरेचजण जातात पण विना पैसे खर्च करता कष्टाने आनंदित माणूस मी पाहत होतो).
आम्ही आमच्या घराजवळ पोहचलो आणि मी ३० रुपये काढून त्या वृद्धाच्या हातावर ठेवले.तोच तो म्हणू लागला बाबूजी थंड बहोत है थोडा चाय पिणे के लिये पिसा दिजीये ना.(आणि तो केविलवाण्या नजरेने आमच्याकडे पाहू लागला).माझ्या आई ला हिंदी कळत नाही पण म्हणतात ना शब्दांपेक्षा माणसाला आर्त भावना लगेच कळते आई लगेच मला म्हणाली आणखी १० रु दे बिच्यार्याला येवड्या थंडीच आपल्याला आणलाय.मी आणखी १० रु त्याला दिले.१० रु देताच त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसले तो ते पैसे घेऊन आनंदाने त्याच्या वाटेला निघून गेला आणि आम्ही घरी जावू लागलो.
पण घरी जाताना एक विचार मनामध्ये येत होता एरव्ही आपण मला हे आवडत नाही,माझ्याच नशिबात अस का,मला खूप कष्ट कराव लागत,माझ्याकड पैसाच नाही,मला चांगल खायला मिळत नाही,मी घरापासून दूर राहतो,आणखी चांगली कपडे हवी आहेत अश्या एक ना अनेक गोष्टींचा आपण विचार करत असतो.पण जगात इतरही माणसं आहेत जी आहे त्यातच सुख,समाधान,समृद्धी शोधत आहेत.
आणि रोज नवी धडपड करत आहेत फक्त आणि फक्त जगण्यासाठी..............................

-------- लेखन ------
अभिजित निंबाळकर    



Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ