अंतर


“अंतर”



हि गोष्ट मी स्वतः पाहिलेला माझा अनुभव आहे.आमचे ट्रान्स्फर झाल्यामुळे आम्ही १८ लोक बिहार मधील पटना या शहरात नोकरी साठी आलो होतो. तसा बिहार हा प्रदेश आमच्यासाठी पूर्णपणे नवीन आणि खूप वेगळ्या संस्कृतीचा प्रदेश (आम्ही महाराष्ट्र सारख्या सधन भागातून आल्यामुळे आम्हाला बिहार खूप वेगळ वाटल होत).
सर्वात नवीन अनुभव म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी ट्रेन चा इतका दूरचा प्रवास केला होता (जवळ जवळ २००० किमी तो हि सर्व सुविधांयुक्त मुंबई ते पटना सुविधा एक्स्प्रेस या ट्रेन ने).तर पटना मध्ये सुरवातीच्या कळत आम्ही सर्वजन खूप फिरायचो (सगळ्यात जास्त आम्हाला फिराव लागल ते जेवणासाठी कारण आम्हाला महाराष्ट्रीयन जेवणाची सवय होती.अनेक हॉटेल मध्ये फिरत असताना आम्हाला खूप वेगवेगळे आणि मजेशीर अनुभव आले ते मी माझ्या पुढच्या लेखात लिहीन).
तर आता मूळ गोष्टी वर येवूया आम्ही पटना मधील बोरिंग रोड या ठिकाणी राहतो त्यामुळे बोरिंग रोड ला असणार्या V Mart या मॉल मध्ये नेहमी फिरायला जायचो.असेच एकदा आम्ही ४-५ लोक रविवारी संध्याकाळच्या वेळेला मॉल मध्ये गेलो.थोडीफार खरेदी केली (सवयीप्रमाणे फक्त फिरण्यासाठी गेलो होतो).आणि बाकी मित्रांना बाहेर येण्यासाठी अजून वेळ होता म्हणून मी बाहेर रस्त्यावर जावून उभा राहिलो.बाहेर उभा असताना सवयीप्रमाणे काही गोष्टींच निरीक्षण करत होतो.
माज्या नजरेस एक गोष्ट आली एक कुटुंब जे फुगे विकून आपला उदार्निवाह करत होत ते रस्त्या च्या कडेला मॉल च्या बाहेर बसल होत (नवरा बायको एक ७-८ वर्षाची मुलगी,एक लहान मुलगा,आणि जेमतेम १०-१२ वर्ष्याचा मोठा मुलगा).बहुदा त्या लहान मुलाला खूप भूक लागली असाची कारण रस्त्यावर पडलेले चणे तो चवीने वेचून खात होता.त्या कुटुंबातील कुणाच्याही अंगावर चांगले कपडे न्हवते (अतिशय मळलेले आणि खूप ठिकाणी फाटलेले कपडे होते).तरीही ते संपूर्ण कुटुंब अगदी आनंदात होत, ती लहान मुलगी अगदी आनंदाने हसत खेळत  फुगे विकण्याच काम करत होती.बहुदा खूप दिवस अंघोळ केलेली नसतानाही तिच्या चेहऱ्यावर एक एक अजब स्मितहास्य आणि एक तेज होत.मॉल मधून येणाऱ्या जाणार्या सर्वाना ती फुगे घेण्याचा आग्रह करायची. (अनेक लोक तिला ढकलून बाजूला करायचे कारण हजारो रुपयाची शोप्पिंग करणार्यांकडे १० रु चा फुगा घेण्यासाठी पैसे न्हवते,तरीही ती छकुली हसत खेळत पुन्हा फुगे विकायची).
मी असाच त्या चिमुकलीचा प्रचंड उत्साह आणि तिची जगण्यात आनंद घेण्याची वृत्ती पाहत उभा होतो.मी आणखी एक दृश्य पाहिलं. मॉल च्या गेट च्या दुसर्या बाजूला एका पाणी पुरी च्या ठेल्या वर खूप तरुण मुला मुलींची गर्दी होती.एक मुलीचा ग्रुप खूप photos आणि सेल्फी कडत उभा होता पाणी पुरी खात (बहुदा सर्व मुलींकडे I phone तसेच महागडे phone होते).अचानक त्या मुलींपैकी एकीने फुगे विकणाऱ्या लहान मुलीला जवळ बोलावलं.ती चुमुकली आनंदाने नाचत गेली (कारण तिला वाटल असाव आता त्या मुली फुगे घेतील आणि आपल्या किमान एक वेळेच्या अन्नाची सोय होईल).
पण त्या सेल्फी काढणाऱ्या मुलींनी त्या चिमुकली च्या हातातील फुगा घेतला आणि फुग्य सोबत सेल्फी कडू लागल्या आणि photos कडून झाल्यावर त्या चिमुकली च्या हात पुन्हा फुगा परत देवून तिला ढकलू लागल्या.ती छकुली एक तरी फुगा विकत घेण्यासाठी खूप विंनती करत होती पण कुणीही नाही घेतला शेवटी ती चुमुकली किमान एक पाणी पुरी ची मागणी करू लागली त्या मुलींकडे (कारण तिला खूप भूक लागली असावी).पण कुणीच तिला साधी एक पाणी पुरी पण नाही दिली तिला ढकलू लागले.बहुदा पाणी पुरी वाल्याला तिची कीव आली असावी म्हणून त्याने एक पुरी त्या चीमुकलीच्या हातात दिली.ती आनंदाने उड्या मारत ती पुरी घेवून तिच्या लहान भावाजवळ गेली आणि त्याला खायला दिली (तिला खूप भूक लागली असताना हि त्याग कश्याला म्हणतात हि गोष्ट मला त्या छकुली कडून शिकायला मिळाली).
या गोष्टीवरून मला समाजातील “अंतर” पाहायला मिळाल.एकीकडे काही लोकांच्याकडे खायला हि नाही पण समाधान,सुख,आनंद,त्याग,कर्तव्यनिष्ठा या गोष्टी आहेत.आणि दुसरीकडे काही लोकांच्याकडे सर्व गोष्टी आहेत पण आनंद,समाधान,सुख,या गोष्टी नाहीयेत.
त्या दिवशी मला समाजातील एक भीषण “अंतर” दिसुन आल.जे मन सुन्न करणार होत,थोड्या वेळात माजे मित्र मॉल च्या बाहेर आले आणि आम्ही आमच्या रूम कडे निघालो.तिथून जात असताना आणि त्या रात्री रात्रभर माझ्या मनात फक्त आणि फक्त समाजातील असणाऱ्या भीषण अंतराचाच विचार मनामध्यें होता आणि मन सुन्न होत होत.
हो आणि आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून घरी जाताना त्या चीमुकली कडून २ फुगे घेवून घरी गेलो.(काही लोकांना वाटल असेल कि सर्व फुगे का नाही घेतले, ते आम्ही घेवू शकलो असतो पण त्या चिमुकली चा स्वभीमान दुखावला असता).

                                              लेखन :- अभिजित निंबाळकर (९९२२०२३३००).



(टीप :- सदर चे छायाचित्र हे प्रातिनिधिक आहे वरील घटनेशी त्याचा काहीही संबध नाही)


Comments

Rhushikesh desai said…
Great abhi....well done....I m or all frds are waiting for your next upcoming blog as well as novel.

Abhi.well done....your mind so clear...began for novel...
Unknown said…
Thank you rhushikesh
Unknown said…
Very nice abhijeet this is the real situation in our country some people are don't care about poor pepoles situation.very nice experience you have written.
Unknown said…
आपल्याकडून जेवढं होत,तेव्हढं केलं पाहीजे
Anonymous said…
really heart touching ..while reading i visualised the whole scene and felt pity for that little gl..
Kiran D. Jadhav said…
Perfectly narrated...

I remembered that day, you forced to buy the baloons.
It was not about the childish behaviour, it's were all about the sympathy and care you taken for that family.

We really like your kind and helpful nature. As we also used to contribute to poor peoples.
Unknown said…
Khup chan Abhi 👏🏻 asach lihat raha.

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ