महागाई
महागाई .....
महागाई मुळे आता जगणे झाले महाग
कशी मिटवायची सांगा गरिबांनी पोटाची आग
गरिबांना मिळत नाही खायला अन्न
सरकार मात्र देताय दारू साठी धान्य
दारू म्हणजे नशा आणि नशा म्हणजे अंत
धान्यापासून होतीये दारू हीच आहे खंत
जगायचे पूर्वी लोक जीवनाची मजा लुटण्यासाठी
आज जागाव लागतंय सर्वाना फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी
अश्यातच वाढलाय भ्रष्टाचार खूप
भ्रष्टाचारामुळे बदलले आहे देशाचे रूप
महागायीमुळे मोडलाय गरिबांच्या पाठीचा कणा
श्रीमंत होतोय श्रीमंत गरीब राहतोय गरीबच पुन्हा
आपणच आहोत आपले गुन्हेगार
कारण आपणच बसतो घरामध्ये गपगार
असेच जर होत राहिले जगणे महाग
करेल गरीन माणूस काहीही फक्त भागवण्यासाठी पोटाची आग
करेल गरीब माणूस काहीही फक्त भागवण्यासाठी पोटाची आग ...........
---- कवी ----
अभिजित निंबाळकर

Comments