आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ भाग पहिला 

मित्रानो आज आयुष्याच्या वाटेवर पुन्हा एकदा मागे वळून पाहताना लहानपणीचे दिवस आठवतात. आणि आठवतात ते लहानपणीचे खेळ जे आजही आठवले तरी चेहऱ्यावर हळूच हसू खुलते. अश्याच अनेक खेळांची माहितीची मालिका मी आता माज्या ब्लॉग वर लिहित आहे. चला तर मग या मालिकेतील पहिला खेळ पाहू.

सायकलची टायर हाताने पळवणे 

जुन्या सायकलची खराब झालेली टायर घेवून ती हाताने किवा एखाद्या छोट्या लाकडी दांडक्याने रस्त्यावर पळवायची मज्जा काय औरच होती.यामध्ये हि टायर पळवत मित्रांबरोबर शर्यत (Race) लावायची आणि कोण जिंकणार हे एकाच ध्येय बाळगून दम लागेपर्यंत फक्त पळतच सुटायचं .या शर्यतीची आज आठवण आली कि Road Rash सारखी कॉम्पुटर गेमही फालतू वाटते. आज बुलेट,R15,तसेच अनेक Branded गाड्या पळवणे सुद्धा या टायरी च्या खेळासमोर काहीच वाटत नाही. त्यावेळी माज्यासोबत टायरी पळवणारे माजे मित्र म्हणजे जणू मला एखाद्या शर्यतीतले प्रतीस्पर्दीच वाटायचे. आणि अखेर शर्यत जिंकल्यावर एकमेकाला चिडवत नाचण्याचा आनंद काही निराला आणि अनमोल असाच होता.
असे लहानपणीचे खेळ आठवल्यावर खरच संत तुकाराम महाराजांच्या ओळी आठवतात  आणि म्हणव वाटत.. "लहानपण देगा देवा".........


लेखन -- अभिजित निंबाळकर


Comments

Unknown said…
Mast abhi. Khup chaan

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ